महापालिका निवडणूक तयारीचाएकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

0
4

पिंपरी, दि 10 (पीसीबी)
पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्न, आगामी महापालिका निवडणूक तसेच संघटनात्मक पातळीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर खासदार श्रीरंग बारणे आणि माजी नगरसवेक प्रमोद कुटे यांनी आज ठाणे येथे सविस्तर चर्चा केली.

ठाणे येथे शिंदे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे आणि माजी नगरसेवक कुटे यांनी भेट घेतली. महापालिका प्रशासन व निवडणुकीबाबत चर्चा केली. आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदिने लढायची आहे त्यासाठी आतापासून तयारीला लागा, असे आदेश शिंदे यांनी यावेळी दिले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील काही महत्वाच्या प्रश्नांबाबत खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शिंदे यांच्याशी चर्चा केली

यावेळी शिवसेना विभागप्रमुख फारुख शेख, सामाजिक कार्यकर्ते मंगेश कुटे उपस्थित होते.
सौजन्य- श्री.प्रमोद प्रभाकर कुटे
(नगरसेवक पिं.चिं.मनपा)