चपलेने मारल्‍याचा बदला म्‍हणून केली तोडफोड

0
10

भोसरी, दि. ९

महिलेने चपलेने मारल्‍याचा बदला घेण्‍यासाठी तिच्‍या घरात घुसून पर्स पळविली. तसेच वाशिंग मशीन आणि दुचाकीची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री सव्‍वा अकरा वाजताच्‍या सुमारास भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्‌टी येथे घडली.

सुरज चंद्रकांत कुर्‍हाडे (वय २२, रा. बालाजीनगर झोपडपट्‌टी, एमआयडीसी, भोसरी) आणि त्‍याचे तीन साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. याबाबत ३८ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. ८) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्‍वा अकरा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी महिला घरी झोपल्‍या होत्‍या. त्‍यावेळी आरोपी सुरज हा आपल्‍या तीन साथीदारांसह तिथे आला. फिर्यादी महिलेच्‍या बहिणीने आरोपी सुरज याला चपलेने मारल्‍याचा राग मनात धरून फिर्यादी यांच्‍या दरवाजा व खिडकीवर दगडफेक करीत खिडकीची काच फोडली. त्‍यानंतर फिर्यादी महिलेच्‍या घरात घसून तिची पर्स चोरून नेली. तसेच जाताना घराबाहेर ठेवलेली वाशिंग मशीन आणि दुचाकीची तोडफोड केली. हातातील कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे. तुम्‍ही जर कोणी मध्‍ये आलात तर कोणालाच सोडणार नाही, असे म्‍हणत दहशत निर्माण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.