भोसरीमध्‍ये ७७ हजारांची घरफोडी

0
10

भोसरी, दि. ९

दरवाजाचचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७७ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना आळंदी रोड, भोसरी येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली.

अमोल बाबुराव माने (वय ४०, रा. ओमसाई कॉलनी, आळंदी रोड, भोसरी) यांनी बुधवारी (दि. ८) भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी माने यांचे घर मंगळवारी रात्री साडेअकरा ते बुधवारी सकाळी साडेसहा वाजताच्‍या दरम्‍यान कुलूप लावून बंद होते. त्‍यावेळी अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले ७७ हजार रुपयांचे सोन्‍याचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.