राष्ट्रवादी विद्यार्थी सेलची शरद पवार यांच्याशी चर्चा

0
8

मुंबई,दि. 9 (पीसीबी)
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाच्या विद्यार्थी सेलची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. पक्षाची ध्येयधोरणे आणि पुढील वाटचाली संदर्भात वरिष्ठांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या आढावा बैठकीला माजी मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, तसेच राज्यभरातील विद्यार्थी सेलचे पदाधिकारी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.