जिल्हा न्यायाधिशांबरोबर पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार पदाधिकाऱ्यांची चर्चा

0
11


पिंपरी, दि. 9 (पीसीबी) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश महाजन यांची नुकतीच भेट घेतली. भेटीत पिंपरी न्यायालयात येऊ घातलेले वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, अतिरिक्त सत्र न्यायालय, नवीन न्यायालयीन इमारतीचे सुरू असलेले बांधकाम, पिंपरी न्यायालयातील प्रलंबित मार्गी लागलेले प्रश्न व आगामी काळात करावयाची कामे अशा विविध प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली.

यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, सचिव ॲड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲड. रिना मगदूम, सहसचिव ॲड. राकेश जैद, खजिनदार ॲड.अक्षय फुगे, ऑडिटर ॲड. शंकर घंगाळे, सदस्य ॲड. संकेत सरोदे, ॲड. विकास शर्मा, ॲड. राजेश राजपुरोहित, ॲड मानसी उदासी, ॲड सीमा शर्मा, ॲड संघर्ष सूर्यवंशी यांच्यासोबतच पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. कुमार पायगुडे, पिंपरी बारचे मा. सचिव ॲड. धनंजय कोकणे, सदस्य ॲड. मंगेश खराबे आदी उपस्थित होते.