अजित गव्हाणे, राहुल कलाटे यांची निकाला विरुध्द उच्च न्यायालयात धाव

0
11

मुंबई,दि. 9 (पीसीबी)
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला असला, तरी निवडणूक प्रक्रियेवरून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र अजूनही सुरूच आहेत. निवडणूक निकाला विरोधात याचिका दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 35 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल झाल आहेत. याचिका मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झाले असून विजयी उमेदवारांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीतील कवित्व अजूनही पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील बारा पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. सर्वाधिक महिला अहिल्या नगर जिल्ह्यातून आठ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

संजय शिरसाठ, धनंजय मुंडे, सुरेश धस ,हिकमत उढाण, संतोष दानवे, तानाजी सावंत , अर्जुन खोतकर, आमदार रमेश कराड, नमिता मुंदडा , संजय बनसोडे, राजू नवघरे , बाबासाहेब पाटील, मंजुळा गावित, अमोल पाटील आदी आमदारांविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमधील पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रशांत जगताप, अजित गव्हाणे, महेश कोठे, नरेश मणेरा, सुनील भुसारा, मनोहर मढवी, राहुल कलाटे, वसंत गीते, संदीप नाईक, रमेश बागवे यांनी उच्च न्यायालयामध्ये निवडणूक निकाल विरोधामध्ये धाव घेतली आहे,

वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखीव
दरम्यान, वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखीव ठेवला आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून गायकवाड यांनी गेल्यावर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजप उमेदवार वकील उज्ज्वल निकम यांच्याविरुद्धच्या प्रमुख लढतीत गायकवाड यांनी विजय मिळवला होता. निवडणुकीदरम्यान जाहिरातपत्रकांवर (हँडबिल) मुद्रक आणि प्रकाशकांच्या नावांचा समावेश असणे अनिवार्य आहे, परंतु, त्याबाबतच्या निकषांची पूर्तता गायडवाड यांच्याकडून केला गेला नाही, असा दावा करून या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे, याचिका अर्थहीन असून आपण नियमांचे उल्लंघन केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा गायकवाड यांच्यावतीने करण्यात आला आङे.

दरम्यान, वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून गायकवाड यांनी गेल्यावर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याविरुद्धच्या लढतीत गायकवाड यांनी विजय मिळवला होता. निवडणुकीदरम्यान जाहिरातपत्रकांवर (हँडबिल) मुद्रक आणि प्रकाशकांच्या नावांचा समावेश असणे अनिवार्य आहे, परंतु, त्याबाबतच्या निकषांची पूर्तता गायडवाड यांच्याकडून केला गेला नाही, असा दावा करून या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले आणखी एक उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. तसेच, गायकवाड यांनी जाहिरातपत्रकांद्वारे खोटी आश्वासने दिल्याचा दावाही याचिकेद्वारे केला आहे. परंतु, याचिका अर्थहीन असून आपण नियमांचे उल्लंघन केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा गायकवाड यांच्यावतीने करण्यात आला. तसेच, याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली गेली आहे.