कोयता बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

0
19

दिघी, दि .8 (पीसीबी)

कोयता बाळगल्या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 7) दुपारी चऱ्होली बुद्रुक येथे करण्यात आली.

आकाश नंदू पठारे (वय 23, रा. चऱ्होली बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली बुद्रुक येथील वाघेश्वर महाराज क्रीडा संकुलासमोर एक तरुण शस्त्र घेऊन आल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आकाश पठारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.