किरकोळ कारणावरून एकास मारहाण

0
18
crime

पाच जणांना अटक

दापोडी, दि .8 (पीसीबी)

आमच्या वाहनाला धडक का दिली असे म्हणत पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 5) रात्री आठ वाजताच्या सुमारास कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

योगेश महादेव पोफळकर (वय 18), ओंकार संभाजी लांडगे (वय 23), श्रेयस बाळासाहेब लांडगे (वय 24), गौरव नरेश काशीद (वय 23), सनी राजेंद्र लांडे (वय 30, सर्व रा. कासारवाडी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रवीण जालिंदर बंगे (वय 35, रा. पिंपळे सौदागर) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण हे त्यांच्या कारमधून पिंपळे गुरव येथे जात होते. कासारवाडी येथे आरोपींनी प्रवीण यांची गाडी अडवली. आमच्या गाडीला धडक का दिली असे म्हणत शिवीगाळ करून प्रवीण यांना मारहाण केली. या मारहाणीत प्रवीण यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.