रावेत, दि .8 (पीसीबी)
जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 5) मुकाई चौक रावेत येथे घडली.
करण किशोर मोरे (वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश अनंता टोंपे (वय 21), सुरज बिरू बुधनर (वय 21), यश श्रीपाद खोंडवे (वय 24), रोहन राहुल मस्के (वय 21, सर्व रा. चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी करण मोरे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. ऋषिकेश याने प्लास्टिकची खुर्ची करण यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.