शिरगाव, दि .8 (पीसीबी)
शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारला. यामध्ये एक लाख 75 हजार रुपये किमतीचे रसायन आणि तयार दारू नष्ट करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 7) सकाळी 11 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल भगवंता मुठे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अलका कुंदन नानावत (वय 47, रा. शिरगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पवना नदीच्या काठावर दारू भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये एक लाख 75 हजार रुपये किमतीचे पाच हजार लिटर दारू तयार करण्याचे रसायन आणि तयार दारू नष्ट करण्यात आली आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.