टेम्पोच्या धडकेत वृद्ध जखमी

0
22

चिखली दि. ४ (पीसीबी) – टेम्पोने धडक दिल्याने वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. ४) रात्री पूर्णानगर, चिखली येथे घडली.

नागनाथ प्रभाकर वाघमारे (वय ६०, रा. पूर्णानगर, चिखली) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघमारे हे नातेवाईकांसोबत पूर्णानगर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आले असता एका टेम्पोने त्यांना धडक दिली. त्यामध्ये वाघमारे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता आरोपी टेम्पो चालक पळून गेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.