सावित्रीबाई फुले यांनी स्वाभिमानाची ज्योत महिलांमध्ये प्रज्वलित केली – चंदकांत इंदलकर

0
21

पिंपरी,दि.03 (पीसीबी) – स्त्रीमुक्तीसाठी अभूतपूर्व लढा देऊन सावित्रीबाई फुले यांनी सक्षमीकरण, स्वावलंबन आणि स्वाभिमानाची ज्योत महिलांमध्ये प्रज्वलित केली, त्यातून प्रेरणा घेऊन कर्तबगार महिला देश विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे सावित्रीबाई फुले यांच्या समर्पित लढ्याचे यश आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शुभेच्छा देताना ते बोलत होते.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महिला शिक्षण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिकेतील कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा दांडगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्वला गोडसे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक, उपअभियंता कविता माने, कार्यालय अधीक्षक मीनाक्षी गरुड, उपलेखापाल गीता धंगेकर, दीप्ती हांडे, वैशाली कलापुरे , दिपाली कर्णे, माया वाकडे, विजया कांबळे, संतोषी चोरगे, वनिता फुले, सुरेखा साळुंखे, सुरेखा सूर्यवंशी, कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष मनोज माछरे , बालाजी अय्यंगार, नितीन समगीर, यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोशी येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, उपआयुक्त राजेश आगळे, मोशी येथील महापालिका शाळेच्या मुख्याद्यापिका सुरेखा दांडगे, पोर्णिमा देवरे, उज्वला मरळे, सामाजिक कार्यकर्ते मनीषा आल्हाट, सायली शिंदे, पल्लवी सुरवसे आदी उपस्थित होत्या.