ओम साई क्रिकेट अकॅडमीने सार्थ केला विश्वास कु. भाविका अहिरे हिला मोठे यश -सौ आशा धायगुडे शेंडगे

0
25

कासारवाडी,दि. 31 (पीसीबी)
ओम साई क्रिकेट अकॅडमी ची खेळाडू कु भाविका मनोजकुमार अहिरे हिने यशाला गवसणी घालत पिंपरी चिंचवड शहराचे नाव महिला क्रिकेट मधे मोठे केले आहे. कु भाविका अहिरे हिची 19 वर्षाखालील T20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप साठी भारतीय संघात निवड झाली आहे.तिचा गुणगौरव कार्यक्रम नुकताच दि.२९ डिसेंबर रोजी कासरवाडी येथे संपन्न झाला.
ओम साई क्रिकेट अकॅडमी ची खेळाडू कु भाविका मनोजकुमार अहिरे हिने यशाला गवसणी घालत पिंपरी चिंचवड शहराचे नाव महिला क्रिकेट मधे मोठे केले आहे. कु भाविका अहिरे हिची 19 वर्षाखालील T20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप साठी भारतीय संघात निवड झाली आहे.भाविका अहिरे हि वयाच्या १० व्या वर्षांपासून ओम साई क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक श्री. संजय हाडके सर यांचे कडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. भाविका हि फलदांज आणि विकेट-किपर म्हणून संघात खेळते.
भाविकाने पंधरा वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र संघातून खेळताना संघाचे कर्णधार पद भूषविले आहे. तिने ह्या प्रदार्पणच्या सामन्यात मुंबई विरुद्ध खेळताना तिने १२९ धावांची शतकी खेळी केली होती आणि फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळविले होते. त्याच्या पुढील वर्षी एकोणीस वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र संघातून प्रदार्पणच्या सामन्यात मेघालय विरुद्ध खेळताना तिने ११९ धावांची शतकी खेळी केली होती. खेळातील सातत्यामुळे भाविकाची तीन वेळा नॅशनल क्रिकेट अकॅडेमि बंगलोर येथे उच्च क्रिकेट प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली आणि त्यातूनच पहिल्या १९ वर्षाखालील महिलांच्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. भारताने आशिया कप स्पर्धेचे अजिक्यपद पटकावले. आता जानेवारी महिन्यात होणारी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुद्धा भाविका खेळणार आहे, हि समस्त पिंपरी चिंचवड शहरवासीयांची अभिमानाची बाब आहे.
भाविका हि भोसरी प्राधिकरण सेक्टर-१० मध्ये राहत असून तिने आपले प्राथमिक शिक्षण श्री श्री रविशंकर विद्यालय आणि माध्यमिक शिक्षण प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल इंद्रायणीनगर येथे पूर्ण केले असून ती सध्या एस पी कॉलेजे पुणे येथून वाणिज्य शाखेत आपले शिक्षण घेत आहे.तिचा गुणगौरव कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका सौ. आशाताई शेंडगे, प्रतिष्ठित उद्योजक श्री. प्रताप मोहिते मामा, माजी रणजी खेळाडू श्री. प्रदीप इंगळे सर, श्री. युवराज कदम, महिला भारतीय क्रिकेपटू सौ. सोनिया डबीर, सौ. मनीषा कोल्हटकर, ज्युडिशियल क्रिकेट क्लब चे संचालक श्री. दीपक शिंदे सर, पिंपरी चिंचवड मधील नामवंत क्रिकेटपट्टू आणि वरिष्ठ प्रशिक्षक श्री. राजू कोतवाल असे अनेक मान्यावर उपस्थित होते. मा रणजी क्रिकेट पट्टू व बीबीसीआय लेव्हल (3) चे कोच मा श्री प्रदीप इंगळे सर मार्गदर्शन करत म्हणाले “ भाविक इतिहास घडवेल व सध्याच्या पालकांचा पाल्य घडविण्यासाठीची धडपड, प्रत्नय वाखान्य जोगे आहे.

भारतीय क्रिकेट खेळाडू सोनिया डबीर यांनी भाविकाला शुभेच्छा देत अपेक्षा व्यक्त केली की ” पुढील काळात ती ओपनच्या महिला क्रिकेट संघातून टेस्ट मॅचेस, वन डे,टी२० च्या मॅचेस खेळुन भारताचे नाव मोठे करेल”.

रणजी क्रिकेट पट्टू युराज कदम म्हणाले, “भाविकाला जे जे मार्गदर्शन केले जाते ते ती अमलात आणते,स्वतः मधे बदल करते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मा नगरसेविका सौ आशा धायगुडे शेंडगे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या,” ज्या खात्रीने कोच मा श्री संजय हाडके यांनी कासारवाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेटकर क्रीडा संकुलातील जागेची मागणी केली व शहरासाठी खेळाडू घडविण्याचा शब्द दिला तो त्यांनी पाळला. मा संजय हाडके सरांनी शहरासाठी नव्हे तर कु भविकेच्या रूपाने देशासाठी खेळाडू घडविला. पालकांनी पाल्यांना मधे क्रीडांगणाची आवड निर्माण केली पाहिजे, मार्गदर्शक कोच यांनी हडके सर यांच्या सारखे प्रयत्न करत खेळाडू घडवले पाहिजेत. या अकॅडमीतून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू श्रावणी देसाई, रोहित हाडके, हर्षल हाडके यांचाही गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
या क्रीडांगणासाठी तत्कालीन आयुक्त मा. श्रावण हर्डीकर राजेश पाटील व विद्यमान आयुक्त शेकर सिह यांचे सहकार्य मिळाले तर तत्कालीन क्रीडा अधिकारी संदीप खोत, विठलं जोशी मिनीनाथ दंडवते, साळवे मॅडम ईत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.

अकॅडमीतून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू श्रावणी देसाई, रोहित हाडके, हर्षल हाडके यांचा ही गुणगौरव सोहळा संपन्न झाला.