पोलीस कर्मचार्‍यानी दिली आई, बहिणीला गोळ्या घालण्‍याची धमकी

0
41

काळेवाडी, दि. ३० (पीसीबी)

प्राॅपर्टीवरून वाद; पत्‍नी व मुलीला केले मारहाणीसाठी प्रवृत्त

प्राॅपर्टीच्‍या वादातून एका पोलीस कर्मचार्‍याने स्‍वत:च्‍या आई व बहिणीला अश्‍लिल शिवीगाळ केली. तसेच त्‍या दोघींनाही गोळ्या घालण्‍याची धमकी दिली. ही घटना काळेवाडी येथे शनिवारी (२८ दिसंबर) दुपारी पावणे दोन वाजताच्‍या सुमारास घडली.

याबाबत काळेवाडी येथे राहणा-या ५४ वर्षीय बहिणीने विनयभंगाची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ५३ वर्षीय भावाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी आणि त्‍यांची बहीण यांच्‍यात आई वडिलांच्‍या प्राॅपर्टीवरून वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी पावणेदोन वाजताच्‍या सुमारास आरोपी पोलीस कर्मचारी आपली पत्‍नी आणि मुलीसह बहिणीच्‍या घरी आला. बहिणीसोबत आई देखील होती.

त्‍यावेळी भावाने आई आणि बहिणीला शिवीगाळ केली. तसेच आरोपीची पत्‍नी आणि मुलीनेही त्‍यांना शिवीगाळ केली. मी पण पोलीस आहे. मी तिला गोळ्या घालतो, काय होईल ते होईल. त्‍यानंतर पत्‍नी आणि मुलीला म्‍हणाला की तुम्‍ही दोघींनी बहीण आणि आईला मारहाण केली नाही तर मी फास लावून आत्‍महत्‍या करेन. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.