इथे टेम्पो लावू नका म्हटल्याने टेम्पो चालकाला बेदम मारहाण

0
33

बावधन, दि. 30 (पीसीबी)
इथे टेम्पो लावून धंदा करू नका, असे म्हटल्याने तिघांनी मिळून एका टेम्पो चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २९) दुपारी साडेतीन वाजता बाणेर येथे घडली.

ज्ञानेश्वर दत्तराव कदम (वय ३८, रा. म्हाळुंगे गाव, मुळशी) यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश, विजय, अनिल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राधा चौक बाणेर येथे टेम्पो घेऊन थांबले होते. तिथे आरोपी आकाश आणि विजय हे त्यांचा टेम्पो घेऊन थांबले होते. ज्ञानेश्वर यांनी आरोपींना ‘या स्टॅन्डवर आम्ही पूर्वीपासून गाड्या लावतो. तुम्ही इथे गाड्या लावल्याने त्याचा आमच्या धंद्यावर परिणाम होतो. तुम्ही गावातील स्टॅन्डला टेम्पो लावा’ असे सांगितले. त्यावरून आरोपींनी ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करून दगडाने मारून जखमी केले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.