धडक दिलेल्या कार चालकाला अडवणाऱ्यास उडवले

0
32

पिंपरी,दि. २9 (पीसीबी)
कारने समोरच्या कारला धडक दिली. त्यामुळे धडक देणाऱ्या कारला थांबवत असताना आरोपी चालकाने एकास उडवले आणि पळून गेला. ही घटना १३ डिसेंबर रोजी पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे घडली.

रोहन किरण कुलकर्णी (वय ३१, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात २८ डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन कुलकर्णी पुणे-मुंबई महामार्गावरून कार मधून जात होते. चिंचवड येथे त्यांच्या कारला एका कारने पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये कुलकर्णी यांच्या कारचे नुकसान झाले. त्यामुळे कुलकर्णी यांनी धडक देणाऱ्या कारचा पाठलाग केला. धडक देणाऱ्या कारला आपली कार आडवी लावून आरोपीची कार अडवली. त्यानंतर आरोपी चालकाला खाली उतरण्यास सांगत असताना आरोपी चालकाने कुलकर्णी यांना धडक दिली आणि पळून गेला. यात कुलकर्णी जखमी झाले आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.