लॉकडाऊन कालावधीत सांभाळले नाही म्हणून तरुणास मारहाण

0
37

चिंचवड,दि. २9 (पीसीबी)
लॉकडाऊन कालावधीत सांभाळले नाही म्हणून एका तरुणाला आणि त्याच्या आईला मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर चव्हाण (वय २८, रा. आनंदनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन कालावधीत फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी अमर चव्हाण याच्या घरच्यांना सांभाळले नाही, म्हणून त्याने फिर्यादी यांच्या घरी येऊन घरातील साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून मारण्याची धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.