टोळक्याकडून तरुणाला मारहाण

0
39
crime

देहूरोड, दि. २9 (पीसीबी)
दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी चार वाजता देहूरोड येथे घडली.

मिथिलेश रमेश शिंदे (वय २१, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल टाक (वय २१), सुमित वाघमारे आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिथिलेश हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. देहूरोड बाजारातून जात असताना त्यांना आरोपींनी मारहाण केली. आरोपी सुमित याने बियरची बाटली मिथिलेश यांच्या डोक्यात फोडली. इतर आरोपींनी त्यांना खाली पाडून बेदम मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.