बीड आणि परभणी प्रकऱणावर मोर्चा, उद्या मराठा समाजाची महत्वाची बैठक

0
16

पिंपरी,दि. २8 (पीसीबी)
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली निर्घृण हत्या आणि 20 दिवसानंतर सुद्धा मुख्य आरोपींना अटक केली जात नाही, ते फरार आहेत. याच्या निषेधार्थ पुणे पिंपरी चिंचवड येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधिल सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा,सर्व सामाजिक संघटना व पदाधिकारी,कार्यकर्त्यांची बैठक उद्या रविवार दिनांक 29/12/2024 रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक,थेरगाव गावठान येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.