पैसे देऊन शरीरसुख देण्यासंदर्भात वारंवार केले मेसेज, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दि. २7 (पीसीबी) – एका ‘प्ले बॉय’ म्हणून काम करणाऱ्या तरुणाने स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. आपण ‘प्ले बॉय’ आहोत असे सांगत या तरुणीला ‘शरीरसुख घे आणि मला पैसे दे’ असे त्याने वारंवार मेसेज केले. विशेष म्हणजे हा तथाकथित ‘प्ले बॉय’ या तरुणीच्या महाविद्यालयात शिकत होता, असेही समोर आले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
कमलेश ऊर्फ कार्तिक गेहलोत असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७५ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी २५ वर्षीय विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी मूळची सांगली जिल्ह्यातील असून ती दोन वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहे. तिचे बीबीएपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीमध्ये झालेले आहे. ती सध्या पुण्यात स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करीत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सांगलीमध्ये ज्या महाविद्यालयात शिकत होती त्याच महाविद्यालयात आरोपी गेहलोतही शिकण्यास होता. तो पीडित तरुणीला महाविद्यालयात ‘सीनियर’ होता.
त्याने साधारण सहा ते सात महिन्यांपूर्वी या तरुणीला फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली होती. संबंधित तरुणीने तो तिच्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे याची खात्री करून त्याची फ्रेंन्ड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर, त्यांच्यामध्ये चॅटिंगद्वारे संवाद सुरू झाला. त्यावेळी त्याने तो महाविद्यालयातील सीनियर असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी त्याने २४ डिसेंबर २०२४ रोजी त्याने फेसबुक मेसेंजरवर या तरुणीला मेसेज केला. त्याला या तरुणीने ‘बोला’ असे म्हणत प्रतिसाद दिला. तेव्हा त्याने ‘प्ले बॉय आहे मी. यू वॉन्ट सम फन? मॅड काय यात? खरेच बोलत आहे. ६ इंच… व्हाईट स्किन ऑल बॉडी. छान दिसतेस तू. सगळे प्रायव्हेट राहणार. कॉल मी. तुला पेड करावे लागेल मला. आय एम ए प्लेबॉय. तुला जे करायचे ते मी करेन. बोल ना’ अशा प्रकारचे अनेक मेसेज केले. अशा प्रकारचे मेसेज करून त्याने या तरुणीचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याचे मेसेज पाहिल्यानंतर या तरुणीने तिच्या मित्रांना तसेच घरी कुटुंबीयांना फोन करून याबाबत माहिती दिली. त्यांनी सल्ला दिल्याप्रमाणे या तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.
स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीने या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपी पीडित तरुणीच्या महाविद्यालयात शिकण्यास होता अशी प्राथमिक माहिती आहे. त्याला तपासाकरिता हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात येणार आहे. त्याच्याकडे याविषयी सखोल तपास करून निष्पन्न होणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.