वाघोलीत पहाटेच्या सुमारास गोळीबार

0
15

पुणे, दि.25 (पीसीबी) : पुणे तिथे काय उणे!? असं म्हटलं जाणाऱ्या पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्ह्याचं उणेपण वाढताना दिसत आहे. पुण्यासारख्या सुसंकृत शहरात गुंडांच आणि गुंडगिरीचं प्रस्थ वाढताना दिसत आहे. दरदिवशी पुण्यातून गुन्ह्याच्या वाढत्या घटना समोर येत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर नवी आव्हाने उभी केली आहेत. गुन्ह्याच्या वाढत्या प्रमाणावार अंकुश ठेवण्याचं काम जरी पोलिसांकडून होत असलं तरी, पोलिसांना चकमा देण्यात गुन्हेगार पटाईत झाल्याचं दिसत आहे. गुन्हे हे बहुधा रात्री किंवा पहाटे करण्यात येतात.
वडजाई वस्ती आव्हाळवाडी रोडवर असलेल्या बाईफ रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर पाहाटे आलेल्या अज्ञातंकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारामध्ये घराच्या काचा फुटल्या असून यात सुदैवाने कोणीही जखमी नाही.

गुन्हेगारांच्या दहशदित सध्या पुणे शहराला वेगळी ओळख मिळाली आहे. एक काळी शिक्षणाचं माहेर घर मानले जाणाऱ्या पुणे शहराला गुन्हेगारीच महाविद्यालय अशी ओळख निर्माण झाली आहे. पुणे शहरात कोयता गॅंग रोज नवीन आव्हान पोलिसांपुढे ठेवत असताना आता बंदुकीचा ही सर्रास वापर होताना दिसत आहे. पुण्यातल्या वाघोली परिसरात राहणाऱ्या एका घरावर गोळीबार करण्यात आलं आहे. हा गोळीबार पहाटेच्या सुमारास करण्यात आला होता. तर गोळीबार झाला तेव्हा घरात सगळे झोपेत होते. या घटनेची नोंद वाघालो पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

दहशतीचे वातावरण
निलेश सुभाष सातव याच्या घरावर गोळीबार झाला असल्याची माहिती आहे. ते वडजाई वस्ती आव्हाळवाडी रोडवर असलेल्या बाईफ रोडवर राहतात. आज पहाटे साडेचारच्या सुमारास हा गोळीबार झाला असल्याची माहिती आहे. घटनास्थळी पुंगळी आढळून आली आहे. गोळीबार नेमका कोणी केला. शिवाय हा गोळीबार करण्याचं काय कारण होतं, हे अद्याप कळू शकलेलं नाही. अज्ञाताचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. गोळीबार झालेला परिसर आणि कुटूंबीय सध्या दाहशतीच्या वातावरणात आहे.