कॅलेंडरमधील सुट्ट्यांची यादी

bpcauthor bpcauthor
3 Min Read

नवी दिल्ली, दि. २४ : सन २०२४ या वर्षाचा शेवटचा महिना संपत आला आहे. काही दिवसातच नवीन वर्ष २०२५ ला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्ष सुरू झाल्यावर रविवार आणि शनिवार वगळता इतर अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. याचदरम्यान केंद्र सरकारकडून नवीन वर्षाच्या कॅलेंडरमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. २०२५ मध्ये १७ सार्वजनिक सुट्ट्या आणि ३४ प्रतिबंधित (पर्यायी) सुट्ट्या असतील. एकंदरीत कर्मचाऱ्यांना साप्ताहिक रजेव्यतिरिक्त ४१ सुट्या मिळणार आहेत.

यावर्षी एकूण ५२ रविवार आहेत. तसेच, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या स्वरूपात २६ सुट्ट्या असतील. सामान्य सरकारी कर्मचाऱ्याला २०२५ मध्ये अंदाजे ९० ते १०० सुट्ट्या (सार्वजनिक, रविवार आणि शनिवारसह) मिळतील. बहुतेक सुट्ट्या जानेवारी, एप्रिल, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये आहेत. जसे की गुरू गोविंद सिंग जयंती, मकर संक्रांती, लोहरी, पोंगल आणि प्रजासत्ताक दिन जानेवारीत साजरे केले जातील. एप्रिल हा नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात या महिन्यात महावीर जयंती आणि गुड फ्रायडे आहे. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, जन्माष्टमी आहेत. ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीपासून सुट्ट्या सुरू होत आहेत. या महिन्यात दसरा, दिवाळी आणि छठच्या सुट्ट्या असतील. २०२५ मध्ये कर्मचाऱ्यांना काही लाँग वीकेंड देखील मिळतील. जानेवारी, मार्च, एप्रिल, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये सलग तीन ते चार सुट्या असतील. २०२५ मध्ये शनिवार आणि रविवारच्या नियमित सुट्ट्यांव्यतिरिक्त शेअर बाजार १४ दिवस बंद राहणार आहे. म्हणजेच शेअर बाजारातही १४ दिवस सुट्टी असेल. नवीन वर्ष सुरू होण्यास अगदी काहीच दिवस उरले आहेत.

सार्वजनिक सुट्ट्या

प्रजासत्ताक दिन: २६ जानेवारी (रविवार)

महाशिवरात्री: २६ फेब्रुवारी (बुधवार)

होळी: १४ मार्च (शुक्रवार)

ईद-उल-फित्र: ३१ मार्च (सोमवार)

महावीर जयंती: १० एप्रिल (गुरुवार)

शुभ शुक्रवार: १८ एप्रिल (शुक्रवार)

बुद्धपौर्णिमा: १२ मे (सोमवार)

ईद-उल-जुहा (बकर ईद): ७ जून (शनिवार)

मोहरम: ६ जुलै (रविवार)

स्वातंत्र्य दिन: १५ ऑगस्ट (शुक्रवार)

जन्माष्टमी: १६ ऑगस्ट (शनिवार)

मिलाद-उन-नबी (ईद-ए-मिलाद): ५ सप्टेंबर (शुक्रवार)

महात्मा गांधी यांचा जन्मदिवस: २ ऑक्टोबर (गुरुवार)

दसरा: २ ऑक्टोबर (गुरुवार)

दिवाळी (दीपावली): २० ऑक्टोबर (सोमवार)

गुरू नानक यांचा जन्मदिवस: ५ नोव्हेंबर (बुधवार)

ख्रिसमस डे: २५ डिसेंबर (गुरुवार)

११ व १२ जानेवारीला शनिवार व रविवार सुट्टी आहे. १३ जानेवारीला सुट्टी घेतली तर १४ तारखेला मकर संक्रांतीची सुट्टी मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही ११ ते १४ जानेवारी या कालावधीत लाँग वीकेंडवर जाऊ शकता. १४ मार्चला होळी असून १५ आणि १६ फेब्रुवारीला शनिवार आणि रविवार सुट्टी आहे. अशाप्रकारे तीन दिवस लाँग ड्राईव्हवर जाता येते. त्याचप्रमाणे २९ आणि ३० मार्चला शनिवार-रविवार आणि ३१ मार्चला ईद-उल-फित्रची सुट्टी आहे. म्हणजे तीन सुट्या एकत्र येत आहेत. एप्रिलमध्ये दोन लाँग वीकेंड असतील. १२,१३,१४ आणि १८ एप्रिल हा शुभ शुक्रवार आणि १९-२० एप्रिल शनिवार आणि रविवार आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर १६ आणि १७ ऑगस्टला शनिवार आणि रविवारची सुट्टी असेल. ५ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी आहे, तर ६ आणि ७ सप्टेंबरला शनिवार आणि रविवारी सुट्टी असेल.

Share This Article