पिंपरी,दि.24 (पीसीबी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भर संसदेत आक्षेपार्ह विधान करून त्यांचा घोर अपमान केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या विधानावरून काँग्रेस पक्षाने गृहमंत्री अमित शाह यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.
याअनुषंगाने आज मंगळवार दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक, पिंपरी येथे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष डाॅ.कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शाह यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच याबाबतचे निवेदन मा. अप्पर तहसीलदार देशमुख साहेब, पिंपरी चिंचवड यांना देण्यात आले.
त्याप्रसंगी ज्येष्ठ नेत्या शामलाताई सोनावणे, भाऊसाहेब मुगुटमल, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमरसिंग नाणेकर, सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष वाहब शेख, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, सेवादल अध्यक्ष प्रा. ॲड. किरण खाजेकर, ओबीसी सेल अध्यक्ष सोमनाथ शेळके, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष हिरामण खवळे, व्यापारी सेल अध्यक्ष अमरजितसिंग पाथीवाल, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष ॲड. अशोक धायगुडे, वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे, मयूर जयस्वाल, बाबासाहेब बनसोडे, सचिन कोंढरे पाटील, मुन्साफ खान, बाबा आलम शेख, रशिद मंहम्मद अत्तार, अर्चना राऊत, वैशाली पवार, याकुब इनामदार, वसंत वावरे, एम आर पाल, ॲड. अनिकेत रसाळ, मिलिंद फडतरे, मकरध्वज वयादव, संदेश बोर्डे, सतिश भोसले, आण्णा कसबे, गौतम ओव्हाळ, साजिद खान, सचिन गायकवाड, रवि कांबळे, फिरोज तांबोळी, भास्कर नारखडे, गुंगा क्षीरसागर, पांडुरंग जगताप, विशाल शेलार, गणेश शेलार, सोनू शेख, सुरज कोथिंबीरे, दिपक जाधव, शेषराव दुधमल, भाऊसाहेब पठारे, साहेबराव थोरात आदी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.