दि.24 (पीसीबी) – भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार दिनांक २७ डिसेंबर दुपारपासून ते २८ डिसेंबर सकाळपर्यंत नाशिक आणि पुणे विभागात २७ डिसेंबर दुपारी वादळांची शक्यता आहे. त्यानंतर हे वादळ मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने २८ डिसेंबरच्या रात्री/सकाळी वाहतील. मुख्य वादळ खानदेश , पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागात अपेक्षित आहे. या भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.
दिनांक २८ डिसेंबर रोजी विदर्भ (विशेषतः पूर्व जिल्हे) आणि मराठवाड्यात आणखी वादळे अपेक्षित आहेत, परंतु दिनांक २७ डिसेंबरच्या वादळांच्या तुलनेत कमी तीव्रतेची असतील.
कृपया सर्व संबंधित अधिकारी मुख्यालयात उपस्थित राहावेत आणि त्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही मुख्यालयात राहण्याचे निर्देश द्यावेत. पुढील दोन दिवसांत काही महत्त्वाचे बदल झाल्यास सुचना देण्यात येतील.