चिंचवड, दि.23(पीसीबी)
पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून पोलिसांनी दोन लाख 35 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी रविवारी (दि. 22) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चाकण येथे खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत एक लाख 81 हजार 680 रुपये किमतीचा गुटखा आणि पाच लाख रुपये किमतीची कार जप्त केली. याप्रकरणी जयप्रकाश हरिप्रकाश गुप्ता (वय 25, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार विजय नलगे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी केएसबी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 39 हजार 900 रुपये किमतीचा गुटखा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. किशोर सुदाम सोनटक्के (वय 26) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने हा गुटखा संजय दत्तू सोनटक्के (वय 22, रा. चिंचवड) याच्याकडून आणला असल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार विकास रेड्डी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दापोडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून सहा हजार सातशे रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अनिकेत मिलिंद घोगरे (वय 24, रा. नवी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नवनाथ पोटे यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनने भवरलाल नारायणजी चौधरी (वय 52, रा. चिंचवड) याला अटक केली. त्याच्याकडून 7 हजार 478 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तेजस भालचिम यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.