वाकड, दि.23(पीसीबी)
गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 22) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास म्हातोबा नगर झोपडपट्टी, वाकड येथे करण्यात आली.
याबाबत पोलीस अंमलदार गोविंद डोके यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेकडून 26,400 किमतीचा 528 ग्रॅम गुटखा जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.