गडचिरोली पालकमंत्री यांनाच सारखे सारखे कशासाठी ?

0
5

मुंबई, दि.23(पीसीबी) : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे. मात्र आता पालकमंत्रिपदावरून चढाओढ सुरू होणार आहे. का६ी मंत्र्यांनी आधीच पालकमंत्रिपदावर दावे केले आहेत. पालकमंत्रिपदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात का रस्सीखेच असते यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी यावर बोलताना मोठे विधान केले असून मलिदा मिळावा यासाठी पालकमंत्रिपद हवं असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच दोन जिल्ह्यांची नावे घेत काही लोकांना कायम तिथले पालकमंत्रिपद हवे असल्याचं ते म्हणाले.

बीडमध्ये कोणत्याही मुंडेंना मिळालं तर सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार आहे का? परभणीचे पालकमंत्रिपद अबकला मिळाले तर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळू शकतो का? कल्याणमध्ये पालकमंत्रिपद मिळालं तर मराठी माणसावर अन्याय झाला तो दूर होणार आहे का? हा फक्त एक सत्ता आपल्याकडे रहावी. त्या भागातील आर्थिक व्यवहारांची सूत्र आपल्याकडे रहावीत. कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही. गडचिरोलीचं पालकमंत्रिपद काही लोकांना कायम हवं असतं. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी नाहीतर गडचिरोलीमध्ये हजारो करोडो रूपयांचे खाणीचे उद्योग आहेत त्यातून मलिदा मिळावा यासाठी पालकमंत्रिपद हवं असतं हे माझं आकलन आहे, याच्यावर कोणीही टीका करू शकतं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये वनसपंत्तीचा प्रचंड नाश सुरू आहे. त्यातला वाटा आपल्याला मिळावा म्हणून त्या भागातील पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे आणि असते. हे माझे संपादक पत्रकार म्हणून आकलन आहे. तुम्हाला चुकीचं वाटेल पण ज्यांना हे पाकमंत्रिपद हवंय त्यांच्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत खासगीत बोला तुम्हाला ते हेच सांगतील. मुंबईचं पालकमंत्रिपद मंगलप्रभात लोढा किंवा अन्य कोणाला मिळाल्यावर मराठी माणसांना स्वस्त घरे मिळणार आहेत का? मुंबईतील मराठी माणसाची पीछेहाट थांबणार आहे का? गृहनिर्माण खाते हे त्यांच्या लॉबिमधील बिल्डरांचं धन व्हावं त्यातून आपल्याला लाभ व्हावा म्हणून ही खाती ओढाताण केली जाते, असं संजय राऊत म्हणाले.