चाकण, दि.23(पीसीबी)
भरधाव कंटेनरने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्ति गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 19 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास चाकण तळेगाव चौकात घडली.
लोकेश टेग बोगाटी (वय 36, रा. नेपाळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (एनएल 01/एबी 1578) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोकेश हे त्यांचा भाऊ पुरण बोगाटी याच्याकडे आले होते. भावाला भेटून परत जात असताना चाकण मधील तळेगाव चौकामध्ये रस्ता उलांडात असताना त्यांना एका कंटेनरने धडक दिली. त्यामध्ये लोकेश गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.