दि.23(पीसीबी) – महायुतीच्या विजायनंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे माध्यमांसोर भुजबळांनी स्पष्टच सांगितलं.
काय म्हणाले छगन भुजबळ ?
मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर बोललो. काय काय घडलं, काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, वर्तमानपत्र आणि मीडियातून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या. ते म्हणाले, हे आपण मान्यच करायला हवं, की जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होणार नाही. याची काळजी मलाही खूप आहे.
कदापी जे आहे. ओबीसींचं नुकसान फडणवीस होऊ देणार नाही. पण आता जे काही राज्यात सुरू आहे. आता पाच सहा दिवस मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या आहेत. वेगळं वातावरण आहे. एक आठ दहा दिवस मला तुम्ही द्या. आठ दहा दिवसाने आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू, असं फडणवीस म्हणाले. तसेच मला विनंती आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असं फडणवीस म्हणाले. आठ दहा दिवस वेळ द्या, असं ते म्हणाले.