दोन दुचाकींची धडक

0
7

बावधन,दि.22 (पीसीबी)
एका दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये पुढील दुचाकीवरील तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ओंकार ब्रिज, बावधन येथे घडली.

योगेश बापूसाहेब जाधव (वय ३०, रा. कात्रज, पुणे) यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पियुष शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून हिंजवडी येथून बावधन येथे जात होते. ओंकार ब्रिज येथे सर्व्हिस रोडने जात असताना त्यांच्या दुचाकीला पियुष शर्मा याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने पाठीमागून जोरात धडक दिली. त्या अपघतात योगेश हे रस्त्यावर पडले. त्यांना दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.