*भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महायुती सरकारने कायम सन्मान केला…विधानरिषदे मध्ये आमदार अमित गोरखे यांनी काँग्रेस चा डॉ आंबेडकर विरोधाचा इतिहासच मांडला….

0
6

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भाररत्न देण्याची केली मागणी

नागपूर दि.22 (पीसीबी)   : विधिमंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न असेल किंवा त्यांचे लंडनमधील घर असेल सोबतच आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी असेल ,भारतामध्ये संविधान दिन साजरा करणे असेल ही जबाबदारीची काम ही आमच्या केंद्र शासनाने व महायुती सरकारनेच केले याचा मला अभिमान आहे.
असे परखड मत विधान परिषदे 260 अन्वये इंदू मिल वर बोलताना आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाने दिनांक 19 मार्च, 2013 रोजी दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिल क्र.6, येथील सुमारे 4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती केली.असून . 11 ऑक्टोबर 2015 रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे ,
हिंदू मिलचे काम जवळपास 47% पूर्ण झालेले असून 2025 डिसेंबर पर्यंतचे हे स्मारक पूर्ण करण्याचं काम होत असून
व्यतिरिक्त सुमारे 1000 आसनक्षमता असलेले प्रेक्षागृह, प्रदर्शनाकरीता दालने, संशोधन केंद्र, ग्रंथालय, ध्यानधारणा केंद्र, परीक्रमा पथ, स्मरणिका विक्री केंद्र, प्रतिक्षालय, उपहार गृह, प्रशासकीय कार्यालय, स्वच्छतागृह, बगिचे, वाहनतळ असे मोठे काम त्या ठिकाणी होत असून आज अत्यंत अभिमानाने सांगत आहे की त्या ठिकाणी स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची उंची 350 फुटाऐवजी (250 फूट उंच पुतळा + 100 फुट उंच पादपीठ) 450 फूट (350 फूट + 100 फूट उंच पादपीठ) करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने सादर केलेल्या सुधारीत संकल्पनेस दिनांक 15 जानेवारी, 2020 रोजी मा. मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे सोबतच
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीला राज्य शासनाने दिलेली जमीन अपुरी असल्याने तेथे येणाऱ्या अनुयायांसाठी ही जागा अपुरी पडत आहे त्यामुळे दीक्षाभूमीला आणखी 57 एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी .
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक विकसित करण्यासाठी आपल्या राज्य शासनाने खर्च ३०५ कोटी ६२ लाख २९ हजार १७३ इतका भरून निधी दिला असून आहे. त्यानंतर ११ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, चिरागनगर, घाटकोपर येथे बांधण्याबाबत परवानगी देऊन प्राप्त झाली असून लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होईल.
भारतीय जनता पक्षाने रिकामे आती घेतले आहे ती जवळजवळ 47% होऊन जास्त झालेली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वेळोवेळी सन्मान करण्याचे काम हे भारतीय जनता पक्ष व महायुती सरकारने वेळोवेळी केलेल्या असून आजतागायत काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानच करण्याचे काम केले आहे
शाडो प्राईम मिनिस्ट्री ची स्थापना ज्यावेळी सोनिया गांधी सरकारने केली होती
त्यावेळी सर्वप्रथमता घटनेचे उल्लंघन करण्याचे काम काँग्रेस सरकारने केले आहे.
भंडारा पोटनिवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्याचे कामही याच काँग्रेस सरकारने केलेले आहे.

हिंदू कोर्ट मिल हे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले त्यावेळी सर्वप्रथम त्या विरोध करण्याचे काम देखील याच काँग्रेस सरकारने केलेले आहे आणि त्याचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला होता .

आणि त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले हे पुस्तक देखील लिहिले होते 1967 साली ज्यावेळी आणीबाणी लागली त्याच वेळी इलाहाबाद कोर्टाने सगळे अधिकार काढून घेतले अशा प्रकारचे संविधान विरोधी काम वेळोवेळी काँग्रेस पक्षाने केलेले असून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्याचे काम हे वेळोवेळी आमच्या केंद्र सरकारनेच आणि महायुती सरकारने च केलेले आहे.


त्याबद्दल सरकारच्या अभिनंदन केले व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मूळ गाव असणाऱ्या वाटेगावात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे यासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली
सोबतच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज असून राज्य शासनाने ही या गोष्टीचा विचार करावा
सोबतच मातंग समाजासह संपूर्ण साहित्यिकांची असलेली मागणी म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार अमित गोरखे यांनी केली.