श्नीहर्ष नारायण सावरकर यांचे निधन, अखेरचा दुवा निखळला

0
8

पुणे, दि. २० –
‘ सावरकर बंधू कालाचे ‘ मुख्य पण पडद्याआड राहून काम केल्याने अल्पज्ञात राहिलेले एक शिल्पकार श्रीहर्ष नारायण सावरकर (वय-८६) यांचे १५ डिसेंबरला पुणे येथे निधन झाले. स्वातंत्रसेनानी वि.दा. सावरकर यांच्या धाकट्या बंधुंच्या मुुलांपैकी तेच अखेरचा दुवा होते.
माटुंगा येथील श्रद्धानंद महिलाश्रमाचे संस्थापक, श्रद्धानंद वृत्तपत्राचे स्थापना संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य शिल्पकार डॉ. नारायणराव दामोदर सावरकर यांचे सुपुत्र होते. श्रीहर्ष नारायण सावरकर हे सावरकर बंधूंच्या पुत्रांपैकी जिवंत असणारे शेवटचे होते. गरवारे पेंन्ट कंपनीच्या सेवेत ते होते. हिंदु महासभेच्या कामकाजातही त्यांचे योगदान होते.