चाकण, दि. 19 (पीसीबी)
जुगार खेळणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 18) दुपारी नाणेकरवाडी येथे करण्यात आली.
जिलानी इस्माईल सय्यद (वय 48, रा. मेदनकरवाडी, पुणे), संजय बळीराम गाडे (वय 25, रा. कडाचीवाडी पुणे), गंगाराम सुंदर ओव्हाळ (रा. कडाचीवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुधीर दांगट यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गंगाराम ओव्हाळ याच्या सांगण्यावरून जिलानी आणि संजय हे बेकायदेशीरपणे टाईम बाजार आणि कल्याण नावाचा मटका जुगार खेळवीत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 5760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.