देहूरोड, दि. 19 (पीसीबी)
बनावट कपडे विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 18) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास किवळे येथे करण्यात आली.
मुसा गणी शेख (वय 45, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी नीरजकुमार नरेंद्रकुमार दहिया (वय 37, रा. उत्तर प्रदेश) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे स्टेडियम कडून मुकाई चौकाकडे येणाऱ्या सर्विस रोडवर एका रिक्षा मधून दोन लाख दोन हजार रुपये किमतीचे बनावट कपडे जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये यु एस पोलो, लिव्हाइस, कॅल्व्हिन क्ले इन या कंपन्यांचे हुडी जॅकेट, टी शर्ट अशा कपड्यांचा समावेश आहे. प्रतिष्ठित कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेले बनावट लोगो कपड्यांवर लावून त्याची विक्री केली जात होती. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.