चऱ्होली येथे कारची वाहनांना धडक

0
4

दिघी, दि. 19 (पीसीबी)
चऱ्होली येथे एका कारने वाहनांना धडक दिली. यामध्ये एक दुचाकीस्वार जखमी झाला. तसेच वाहनांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी (दि. 18) पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली.

राजेश भगवान सावंत (वय 33, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक अनिल भिमाजी रांधवण (वय 36, रा. वडमुखवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश सावंत यांचे भाजीपाल्याचे दुकान आहे. ते भाजीपाला घेऊन पहाटे पाच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दुकानाकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला आरोपीच्या ताब्यातील कारने धडक दिली. तसेच इतर वाहनांना देखील कारने धडक दिली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले. तर राजेश सावंत हे जखमी झाले आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत.