कोयत्याचा धाक दाखवून मारहाण

0
6

चिंचवड, दि. 18 (पीसीबी)
कोयत्याचा धाक दाखवत दोन जणांनी एका तरुणास मारहाण केली. ही घटना एसकेएफ जवळील बस थांब्यावर घडली.
आशुतोष कैलास मिसाळ (वय 24, रा. जाधववाडी, चिखली) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनुपम समाधान चौधरी आणि करण कसबे (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी मिसाळ हे एस के एफ कंपनी जवळील बस थांब्यावर आपल्या मैत्रिणीसह उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी बदनामी केल्याचा गैरसमजातून फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली. आरोपी अनुपम चौधरी यांनी शर्टाच्या पाठीमागे लपून ठेवलेला कोयता बाहेर काढला व फिर्यादीवर उगारून ‘शहाणपणा केला तर तुला कापून टाकेल’, अशी धमकी दिली. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.