कॅन्सरवर रामबाण उपाय शोधल्याचा रशियाचा दावा

0
5
  • जगभरात जानेवारी पासून ही लस मोफत मिळणार, नव अद्याप गुलदस्त्यात

दि. 18 (पीसीबी) – कॅन्सर सारख्या गंभीर आजाराबाबत रशियाने मोठा दावा केला आहे. कॅन्सरवर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियाने केला आहे. कॅन्सरवर लस तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे. जगभरातील सर्व रुग्णांना ही लस मोफत देण्याचा दावा या देशाने केला आहे. या नवीन संशोधनामुळे कॅन्सर पीडितच नाही तर त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जगात कॅन्सरचा विळखा वाढत असताना हे संशोधन बहुमोल ठरले आहे. लवकरच जगभरात हे औषध पोहचवण्यात येणार आहे. या औषधांचं नाव काय अथवा त्याचा वापर कसा करणार याविषयीची माहिती अद्याप रशियाने दिली नाही. पण ही लस शरिरातील कॅन्सरचा प्रभाव निष्प्रभ करते आणि त्याचा फैलाव होऊ देत नाही असे समोर येत आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस येणार

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, कॅन्सर विरोधात ही एक लस आहे. ही लस 2025 च्या सुरुवातीलाच बाजारात आणण्यात येणार आहे. रशियातील कॅन्सर रुग्णांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. जगभरात ही लस किती रुपयांना देण्यात येणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही. रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख अँड्री काप्रिन यांनी या लसीविषयी माहिती दिली आहे. ही लस कॅन्सरवर किती प्रभावी ठरणार, कोणत्या कॅन्सरवर गुणकारी ठरणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही. कोणत्या वयाच्या रुग्णांवर त्याचा अधिक प्रभाव दिसेल याविषयीची माहिती काही दिवसात समोर येईल.

रशियात रुग्णांची मोठी संख्या –
या वॅक्सिनचे, लसीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. जगातील इतर देशांप्रमाणेच रशियात पण कॅन्सर ही मोठी समस्या आहे. कॅन्सरचे रूग्ण सातत्याने वाढत आहेत. 2022 मध्ये 6,35,000 हून अधिक रुग्णांची नोंद या काळात झाली आहे. या देशात स्तन, फुप्फुसांचा कर्करोग वाढला आहे. ही लस केवळ ट्युमरची गती कमी करणार नाही तर तिचा आकार सुद्धा कमी करेल.

काय होता पुतिन यांचा दावा?
काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी वैज्ञानिक कर्करोगावरील लस तयार करण्यात रशिया अगदी जवळ असल्याचा दावा केला होता. नवीन पिढीच्या इम्युनोमोड्युलेटरी औषधाची निर्मिती करत असल्याचे ते म्हणाले होते. इम्युनोमोड्युलेटरी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध. ही लस शरीराला कर्करोग, संसर्ग अथवा इतर रोगांशी लढण्यास मतद करणारी असेल असा दावा आहे. मॉस्को फोरम ऑन फ्यूचर टेक्नॉलॉजीच्या मंचावरून त्यांनी या लसबद्दल घोषणा केली होती.