पोलिसात तक्रार दिल्याने एकास मारहाण

0
19
crime

आळंदी, दि. 17 (पीसीबी)
पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. १६) दुपारी दीड वाजताच्या सुमारास कोयाळी येथे घडली.

जीवन दत्तोबा गायकवाड (वय ५७, रा. कोयाळी तर्फे चाकण) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश सर्जेराव आल्हाट (वय ३२, रा. कोयाळी तर्फे चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे त्यांच्या जागेच्या मोजणीच्या खुणा पाहत होते. त्यावेळी आरोपी गणेश तिथे आला. गायकवाड यांच्या मुलीने गणेश याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्या कारणावरून गणेश याने गायकवाड यांना काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. यामध्ये गायकवाड जखमी झाले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.