सुरक्षा रक्षकाला मारहाण

0
16

पिंपरी, दि. 17 (पीसीबी)
गोंधळ घालणाऱ्या लोकांना सुरक्षा रक्षकाने विचारणा केली. त्या कारणावरून दोघांनी मिळून सुरक्षा रक्षकाला दगडाने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. १५) रात्री साडेअकरा वाजता नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

रोहन तुकाराम शिंदे (वय २५, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष हनुमंत विटकर (वय ३०) आणि राजू हनुमंत विटकर (वय ३२, दोघे रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन शिंदे हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. रविवारी रात्री ते नेहरूनगर येथील आर के होम्स राजीवगांधी पुनर्वसन येथे काम करत होते. तिथे रस्त्यावर आरोपी गोंधळ घालत होते. त्यामुळे शिंदे यांनी आरोपींना विचारणा केली. त्या कारणावरून आरोपींनी शिंदे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. संतोष विटकर याने शिंदे यांना दगडाने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.