पिंपरी, दि. 16 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरात माझी वसुंधरातील ५ तत्त्वांची हेळसांड होत असताना पहिला पुरस्कार कसा मिळाला, असा सवाल पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रशांत राऊळ यांनी प्रसिध्दी पत्रातून केला आहे.
१. पृत्वी – खोटी वृक्ष गणना, अवैध वृक्षतोड, पुनः रोपण बाबत उदासीनता, प्लास्टिक बंदी ची चेष्टा, शहरात प्लास्टिक बाटली बंद पाण्याचा सर्रास वापर, कचरा समस्या, रोज निर्माण होणारा १२०० मेट्रिक टन कचरा
2. जल – नदी प्रदुषण, टँकर माफिया, भूजलाचा अमर्यादित उपसा, तलावांची वाईट अवस्था, STP ETP बाबत उदासीनता.
3. वायु – हवेची ढासळती गुणवत्ता, मोडकळीस आलेली सार्वजनिक वाहतूक, अवैध वाहतूक, चिखली कुदळवाडी सारख्या आगीच्या घटना, मोरवाडी आगीवर कोणतीही कारवाही नाही, काळेवाडी दापोडी सारखी भंगार दुकानांना आग.
4. अग्नी – सोलर आणि बायो गॅस साठी कोणतेही प्रोत्साहन नाही वापर करणाऱ्या लोकांना कर सवलत नाही, विजेचा आणि इधनाचा अमर्यादित वापर.
5. आकाश – फक्त नावाला कागदोपत्री इव्हेंट करून लोकांमध्ये पर्यावरण प्रती कोणतीही जन जागृती नाही. शहरातील कचरा जाळणे प्लास्टिक वापर सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करने , वृक्षतोड व त्यात अवैध वृक्षतोड हे सगळे संकेत आहेत.
आता याच गोष्टीवर माझी वसुंधरा मध्ये अवलोकन केले जाते आपल्या सगळ्यांना देखील हे माहीत आहेच मग पालिकेला असा पुरस्कार देण्यासाठी नेमकी काय कारण आहेत हे किमान पत्रकारांनी तरी आयुक्तांना विचारावं ही अपेक्षा