ऑनलाईन माध्यमातून जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

0
29

सांगवी, दि. १५ (पीसीबी)
ऑनलाईन माध्यमातून कल्याण आणि मेन बाजार नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १३) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास नवी सांगवी येथे करण्यात आली.

लखन विठ्ठलराव दूधकवडे (वय ३२, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या १७ वर्षीय साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह मनोहर उर्फ लंगडा मत्यादलभंजन, बाबा कांबळे आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवी सांगवी मधील सुमनश्री मंगल कार्यालयाजवळ मोकळ्या मैदानात ऑनलाईन माध्यमातून जुगार खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सांगवी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ४५ हजार ३०० रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. आरोपी कल्याण आणि मेन बाजार नावाचा जुगार खेळत होते. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.