मंत्रिमंडळाचा विस्तार तारिख पे तारिख, आता…

0
6

मुंबई, दि. 1३ (पीसीबी)
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १६ डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे यापूर्वीच म्हटले होते. त्यानुसार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार त्यापूर्वी होताना दिसत आहे. अशातच येत्या १५ तारखेला नागपुरात मंत्र्याचा शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती होती. ती माहिती खरी ठरली आहे. येत्या १६ तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच १५ डिसेंबर रोजी नागपुरातच शपथविधी होणार आहे. मात्र हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात होत असल्याने त्याच पार्श्वभूमीवर आमदारांची सोय व्हावी, याउद्देशाने शनिवारऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून लवकरच नवीन मंत्री शपथ घेणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे १०, शिवसेनेचे १२ आणि भाजपचे २१ मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे