तळेगाव, दि. 1३ (पीसीबी) : तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबी येथे एका पेट्रोल पंपासमोर पार्क केलेल्या पाच हायवा वाहनांचे स्टार्टर काढून नेले. ही घटना 10 डिसेंबर रोजी पहाटे घडली. समाधान दत्तात्रय सरडे (वय 35, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबी येथील बी एम के पेट्रोल पंपाजवळील पार्किंग मध्ये ट्रक, हायवा अशी अवजड वाहने पार्क केली जातात. 10 डिसेंबर रोजी पहाटे दीड ते तीन वाजताच्या कालावधीत पार्क केलेल्या पाच हायवा (एमएच 14/सीपी 2270, एमएच 14/जीयू 7284, एमएच 14/ईएम 7180, एमएच 14/जीडी 3981, एमएच 14/सीपी 1648) मधील स्टार्टर काढून अज्ञातांनी चोरून नेले. प्रत्येक स्टार्टरची किंमत 15 हजार रुपये आहे. चोरट्यांनी एकूण 75 हजार रुपये किमतीचे स्टार्टर चोरून नेले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.













































