विद्यार्थ्यांनी ताणतणाव विरहीत जीवनशैली अंगीकारावी : डॉ.दीपक शहा

0
3

– प्रतिभा ज्युनियर कॉलेजचा क्रीडा महोत्सव २०२४ उत्साहात साजरा

चिंचवड, दि. 12 (पीसीबी) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेज मधील १५०० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्राधिकरण येथील कै.संजय काळे क्रीडा संकुल मैदानावर क्रीडा महोत्सव २०२४ उत्साहात पार पडला. १०० मीटर धावणे, गोळा फेक, सीट अँड रिच, पुशप आदी क्रीडा स्पर्धात मोठ्या संख्येने महाविद्यालयातील मुला-मुलींनी सहभाग नोंदवीत चमकदार कामगिरी पार पाडली.

स्पर्धेपूर्वी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा ज्युनियर कॉलेजच्या क्रीडा शिक्षक व प्राध्यापकांच्या बैठकीत म्हणाले, खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतो. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अभ्यासाबरोबर त्यांनी आवडत्या खेळात जास्तीतजास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

क्रिडा महोत्सवाच्या उद्धाटनप्रसंगी प्रास्ताविकात ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे म्हणाल्या संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा यांच्या सूचना व प्रोत्साहनामुळे क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देऊन विविध स्पर्धात सहभाग घेतलेल्या खेळाडूना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या. क्रीडा विभाग प्रमुख प्रा.शबाना शेख क्रीडा शिक्षक डॉ.अभय पोद्दार यांनी स्पर्धाचे नियोजन केले.

महाविद्यालयाचा समन्वयिका डॉ.सुनिता पटनाईक, प्रा.जस्मिन फरास, प्रा.वैशाली देशपांडे यांच्या समवेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी क्रीडा महोत्सव 2024 यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.