संस्कार प्रतिष्ठानचा सन्मान

0
3

पिंपरी, दि. 12 (पीसीबी) :  मानवी हक्क जागृती संस्था पुणे यांच्या वतीने जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्थांचा पुणे येथील पं.जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन व कला दालन घोले रोड पुणे येथे सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मेधाताई पाटकर व जिल्हा सत्र व न्यायमूर्ती महेंद्र महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर या संस्थेला विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात श्रीमती मेधाताई पाटकर यांनी संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली जाते याचे तोंड भरून कौतुक केले.अशा सामाजिक संस्था निर्माण होणे काळाची गरज आहे, अशा संस्थामुळे देशात सामाजिक बांधिलकी टिकून आहे. हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, खजिनदार मनोहर कड, संचालिका प्रिया पुजारी, भरत शिंदे, अनुषा पै, आनंद पुजारी, प्रभाकर काणे, संध्या स्वामी, जयवंत सूर्यवंशी, मोहिनी सूर्यवंशी यांनी स्विकारला.