पत्नीला लाटण्याने मारहाण

0
25

सांगवी दि.10 (पीसीबी)
दारू पिऊन आलेल्या पतीने पत्नीला विनाकारण लाटण्याने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. ८) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

याप्रकरणी जखमी पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभाष किसन शिंदे (वय ४५, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष शिंदे हा सोमवारी रात्री दारू पिऊन घरी आला. काहीही कारण नसताना त्याने पत्नी फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत किचन मधील लाटण्याने डोक्यात मारून त्यांना जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.