शहर आगीत होरपळल्यावर प्रशासन लक्ष देणार का? थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
32

महापालिका प्रशासन भ्रष्टाचाराच्या धुंदीत आहे. उद्या शहर आगीत जळून खाक झाले तरी यांची पैशाची मस्ती कमी होणार नाही. कारण तीन वर्षे खा खा खाल्ले. सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी लुटले. ना कुठली विचारणा ना कोणती चौकशी. प्रशासकीय काळात ज्यांची खुशामतखोरी केली तेच पाठिशी असल्याने आता तर खुला परवानाच मिळाला. कामे न करताच फायली क्लिअर झाल्यात. तीन वर्षाच्या प्रशासकिय काळातील सर्व कामांची सखोल चौकशी झाली तर डोळे पांढरे होतील. आता तर विरोधक पूरते खच्ची झालेत. सगळेच अलबेल आहे. ना कोणाला खेद ना खंत. आज इतका संताप आला तो केवळ एका कारणासाठी. कुदळवाडी चिखली परिसरात सकाळी दहाच्या सुमारास एका भंगार मालाच्या गोदामाला लागलेली आग. शेजारपाजरची गोदामेसुध्दा पेटली आणि आगीचे लोळ अवकाशात झेपावताना पाहणारे लोक घाबरले होते. भीषण आगीत अक्षरशः त्या गोदामाचे पत्रा शेड वितळले.

धुराचे लोट वाऱ्यामुळे संपूर्ण परिसरात पसरले आणि आकाश काळवंडले. दोन तास दहा-बारा बंब सतत पाणी ओतत होते मात्र, आग विजत नव्हती. हे दृष्य पाहिल्यावर भ्रष्ट प्रशासन, अग्निशमन विभागातील संबंधीत अधिकाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे, असे वाटले. गेल्या चार-पाच वर्षांत कुदळवाडीची अक्षरशः भंगारवाडी झाली. वर्षांत किमान वीस-तीस वेळा आगीच्या मोठ्या घटना होतात. प्रशासन तेव्हढ्यापुरते कारवाईचे नाटक करते आणि दोन-चार दिवसांत विसरून जाते.

शहरातील आगीच्या घटनांचा आढावा घेतला तर हे प्रशासन किती बथ्थड आहे ते समजेल. आख्खी कुदळवाडी बेकायदा भंगार गोदामांनी व्यापली आहे. आग लागली की नोटीस देतात, सर्वेक्षण होते, पंचनामे होतात, जुजबी सुचना केल्या जातात आणि परिस्थितीत जैसे थे होते. धोकादायक कचरा, रसायनयुक्त कचरा, रबर, कपडा, कागद, पुठ्ठे, टायर, जुनाट लाकडी साहित्य, खोके अशा भंगार मालाचे डोंगर आहेत. एकाही गोदामान किंवा दुकानात कुठेही आग प्रतिबंधक यंत्रणा नाही. हजारो एकराचा परिसर असा बकाल, कंगाल झालाय. पालिका, पोलिस आणि राजकीय कार्यकर्ते हप्ते घेऊन या बेकायदा कामाकडे दुर्लक्ष करतात. काही नेते मंडळी प्रोटेक्क्षन मनी घेऊन संरक्षण देतात. शेकडो आगी लागल्या मात्र, प्रशासन अजूनही शहाणे झालेले नाही. चिखलीच्याच पुर्णानगरला एका माळेवजा दुकानात आग लागून चार जणांचे कुटुंब जाळून खाक झाले. तळवडे येथील मेनबत्ती की फटाका दारुच्या कारखान्यात आग लागली आणि नऊ लाडक्या बहिणींची जळून राख झाली. वाल्हेकरवाडीत कोळश्याच्या वखारीला आग लागली आणि दोन कामगार गुदमरून मेले. एकाकडेही आग्मिशामन विभागाचा परवाना होता ना साधी यंत्रणा होती, मध्यंतरी मुंबईत रुफटॉप हॉटेलात लोक होरळून मेले तेव्हा शहरातील अशा हॉटेलांचे सर्वेक्षण झाले. ९० वर अशी हॉटेले आढळली. मेलेल्याच्या मढ्यावरचे लोणी खाणाऱ्या प्रशासनाने त्यांना नोटीस काढली आणि कारवाईची धमकी दिली. आठ-दहा खोकी मिळताच कारवाई बंद पडली. कुदळवाडीतील हे भंगार गोदाम मालकसुध्दा तेच करतात. कारवाईचा बडगा आला की प्रशासनाचा तोबरा भरतात आणि तोंड बंद करतात. आजवर एकही मायी का लाल पैदा झाला नाही की जो या गोदामांवर कारवाई करेल. अगदी हिंदुत्वाची झुल पांघरलेलेसुध्दा इथे नांगी टाकतात. प्रशासन एजून किती लोकांच्या मरणाची वाट पाहणार हा प्रश्न आहे. जाब विचारणारे नागरिक नाहीत, सभागृहात धारेवर धरायला नगरसेवक नाहीत आणि दुसरा कोणाचाही अंकुश नाही. आगीच्या घटना किती झाल्या, किती लोकांचे जीव गेले, किती संपत्तीची राख झाली याचा लेखाजोख दरवर्षी प्रसिध्द केला पाहिजे.
प्रदुषणाच्या नावाखाली दुकान थाटलेलेल्या प्रशासनाला यातले काहिच दिसत नाही. राज्यातील सर्वात प्रदुषित शहर झाल्याचे दरवर्षी छापून येते. पाणी, हवा प्रदुषणात शहराचे आरोग्य धोक्यात आहे. प्रशासनाचे ब्लॅकमेलिंगचे धंदे जोमात आहेत. धुळीकण वाढले म्हणून बिल्डर्सला नोटीस काढायची आणि पैसे वसूल करायचे. आगीसाठी रुफटॉप हॉटेल मालकांना नोटीस काढायची आणि मांडवली करायची. भंगार गोदामांना नोटीस काढायची आणि माघार घ्यायची. शहरातील हजारो बेकायदा बांधाकमांना नोटीस पाठवायची आणि पेटी-खोके आले की दुर्लक्ष करायचे. अनेक दाखले देता येतील. आज किमान आग लागली त्या निमित्ताने जाब विचारायची वेळ आली आहे. आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील आणि त्यांची टीम खरोखर मनावर घेणार आहेत का हा प्रश्न आहे.

उपाय योजना करण्यासाठी फक्त चौका चौकात फवारे उडवणारे ट

पिंपरी-चिंचवडच्या चिखलीमध्ये पुन्हा एकदा गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी महानगरपालिकेची नऊ अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. काही किलोमीटर अंतरावरून धुरांचे लोट दिसत असल्याने ही आग मोठी असल्याचं बोलले जात आहे. चिखलीत अनेक अनाधिकृत गोडाऊन आहेत. भंगार व्यावसायिकांवर कारवाई करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. परंतु, चिरीमिरीसाठी महानगरपालिकेचे अधिकारी अनाधिकृत आणि बेकायदेशीर गोडाऊनवर कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे.
चिखलीमध्ये नेहमीच आगीच्या घटना घडतात. आज दहाच्या सुमारास चिखली-कुडाळवाडी येथे गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहेत. चिखलीमध्ये मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसाय आणि गोडाऊन असल्याने त्या ठिकाणी नेहमीच आग लागते. यावर महानगरपालिकेने कायमचा तोडगा काढणे देखील गरजेचे आहे. कारण आजूबाजूला नागरी वस्ती आहे. अनेक नागरिक हे चिखली परिसरात राहतात. या आगीच्या धुरापासून त्यांच्या आरोग्याला धोकादेखील उद्भवू शकतो हे नाकारता येत नाही