मोठ्याने बोलू नका म्हटल्याने तरुणाला मारहाण

0
28
crime

बावधन, दि. 08 (पीसीबी)

मोठ्याने बोलू नका म्हटल्याने चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास सुसगाव येथे घडली.

गणेश नारायण कासुर्डे (वय 22, रा. सुसगाव) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम लांडगे, फरदीन सय्यद, रोहित ढमाले, साहिल फडतरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश कासुर्डे हे त्यांच्या खोलीत झोपले होते. त्यावेळी आरोपी रस्त्यावर मोठमोठ्याने बोलत होते. त्यामुळे गणेश यांनी आरोपींना मोठ्याने बोलू नका असे सांगितले. त्या कारणावरून आरोपींनी स्टडी टेबलचा पाईप, ऑफिस चेअर, पडद्याचा लोखंडी पाईप, फरशी पुसण्याच्या पोच्याचा लोखंडी पाईप आणि हातातील कड्याने गणेश यांना बेदम मारहाण केली. बावधन पोलीस तपास करीत आहेत.