पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी विठ्ठलनगर, पिंपरी येथे घडली. हितेश राकेश वाल्मिकी (वय १९, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत वाघमारे (वय २४, रा. नेहरूनगर, पिंपरी) आणि रितिक बनसोडे (रा. नेहरूनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हितेश शुक्रवारी सायंकाळी पायी चालत घरी जात होते. त्यावेळी आरोपी अनिकेत आणि रितिक दुचाकीवरून आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून हितेश यांच्यावर चाकूने वार केले. दोघांनी मिळून हितेश यांना मारहाण करत त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.