ट्रकची कारला धडक; महिला जखमी

0
35

हिंजवडी, दि. 07 (पीसीबी) : ट्रकने एका कारला धडक दिली. त्यामध्ये कार मधील महिला जखमी झाली. हा अपघात गुरुवारी (दि. ५) रात्री हिंजवडी फेज तीन येथे घडला. ऋषभ जयराम पवार (वय २९, रा. हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीग्यान सिंग (वय ३२, रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिमांशू याने त्याच्या ताब्यातील ट्रकने फिर्यादी पवार यांच्या कारला (एमएच ०५/सीझेड ४०४०) धडक दिली. या अपघातात पवार यांची पत्नी जखमी झाली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.